संशयास्पद / फसवणुकीच्या व्यवहाराची नोंद करण्याची प्रक्रिया
तुमच्या खात्यात डेबिट कार्डच्या माध्यमातून अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार करण्यात आला असेल तर तुमची तक्रार नोंदविण्यासाठी आणि एटीएम कार्ड बंद करण्यासाठी खालील गोष्टींचा वापर करा
तुमचे खाते असणाऱ्या बँकेत शाखेच्या वेळेनुसार कळवा
तुमच्या शाखेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या
आमच्या शाखा
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एसएमएस द्वारे डेबिट कार्ड बंद करू शकता
टाईप करा (स्पेस व्यतिरिक्त कॅपिटल लेटर )
CARDBLOCK
आणि या नंबरवर
९२२२०००४०४
एसएमएस पाठवा
काय करावे
- तुम्ही एटीएम व्यवहार करताना पूर्णपणे खाजगीत करत आहात याची खात्री करून घ्या.
- “शोल्डर सर्फिंग” पासून सावध राहा. पिन टाईप करताना इतरांना पाहता येणार नाही अशा प्रकारे किपॅड झाकून घ्या.
- व्यवहार पूर्ण झाल्यावर कार्ड, रक्कम आणि पावती घेतले आहे याची पूर्ण खात्री करुन घ्या. रक्कम घेतली नाही तर एटीएम परत घेत नाही.
- एटीएमला इतर काही उपकरणे जोडली आहेत का हे पाहून घ्या. यामुळे तुमची माहिती घेतली जाऊ शकते! अशा प्रकारचे उपकरण दिसल्यास त्वरित सुरक्षा रक्षक/ बँकेला कळवा. तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आणि एटीएमची रुम सोडून जाण्यापूर्वी एटीएमवर वेलकम स्क्रीन दिसते आहे याची खात्री करून घ्या.
- तुमच्या एटीएम व्यवहाराची माहिती मिळण्यासाठी बँकेत तुमचा मोबाईल नंबरची नोंद करून घ्या. तुमच्या खात्यात कार्ड द्वारे अनधिकृत व्यवहार झाल्याचे आढळून आल्यास डेबिट कार्ड बंद केल्यानंतर त्वरित तुमच्या बँकेला कळवावे.
- जर तुमचे एटीएम/डेबिट कार्ड हरविले किंवा चोरीला गेले तर त्वरित बँकेला कळवावे.
- एटीएम सभोवती असणाऱ्या लोकांच्या हालचालीकडे सतर्कतेने लक्ष ठेवावे. तुम्हाला अनोळखी व्यक्ती बोलण्यात गुंतवत असल्यास सावधगिरी बाळगावी.
- जर तुमच्या कार्डची मुदत संपली असल्यास किंवा तुमचे खाते बंद झाल्यास, कार्डची विल्हेवाट लावताना त्याच्या चुंबकीय पट्टीतून त्याचे चार तुकडे करावेत.
- जर रक्कम मिळाली नाही आणि खात्यातून वजा झाली तर मुंबई बँकेच्या ग्राहकांनी तक्रार अर्ज भरून बँकेच्या शाखेत जमा करावा.
काय करु नये
- तुमचे कार्ड कुणालाही देऊ नका.
- कार्ड वर किंवा कार्डच्या कव्हर वर पिन लिहू नका.
- तुमचा पिन कुणालाही सांगू नका किंवा तुमचे कार्ड इतर कुणाला देऊन पिन सांगून मदत घेऊ नका.
- तुम्ही पिन टाईप करत असताना कुणालाही पाहू देऊ नका.
- सहजरित्या अंदाजाने समजू शकेल असा पिन वापरू नका. उदा. तुमची जन्मतारीख किंवा दूरध्वनी क्रमांक.
- एटीएम मध्ये कार्ड विसरु नका.
- एटीएम मधून आलेली रक्कम घ्यायला विसरू नका, कारण एटीएम रक्कम परत घेत नाही.
- लॉगिन माहिती/ पिन/ ओटीपी / ट्रांजॅक्शन आयडी/ पास्कोड/ खाजगी माहिती इतर कोणालाही सांगू नका.
- चुकीच्या ठिकाणी होणार पत्रव्यवहार टाळण्यासाठी राहत्या पत्त्यामध्ये / मोबाईल क्रमांकामधे बदल झाला असेल तर आम्हाला कळविण्यास विसरू नका.