बँके बद्दल

सहकारी संस्था म्हणजे व्यक्तींनी एकत्रित येऊन त्यांच्या सामान्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लोकशाहीचे नियंत्रण असणारी सयुंक्तपणे निर्माण केलेली संस्था होय. महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय सहकारी पत संस्थेची संरचना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्य पातळीवर काम करणारी सर्वोच्च संस्था आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर काम करणारी संस्था आहे. या बँका शेती तसेच बिगर शेती सहकारी क्षेत्रांमध्ये सदस्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविण्याची महत्वाची भूमिका निभावतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था देखील जिल्ह्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांना अधिकतर निधी देऊन केंद्रीय समतोल राखण्याचे काम करतात.
आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी सर्व सहकारी संस्था आणि महामंडळांना आवाहन करतो की, त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या बँकेकडून आर्थिक साहाय्य घ्यावे.
- स्वयंसेवी आणि मुक्त सदस्यत्व
- लोकशाही सदस्य नियंत्रण
- सदस्य आर्थिक सहभाग आणि नियंत्रण
- स्वायतत्ता आणि स्वातंत्र्य
- शिक्षण, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान
- सहभागातून सहकार्य
- सामाजिक जाणीव





